पारदर्शकता, सोयीसुविधा आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक डिजिटल व्यासपीठ.
वडगाव पिंगळा हे नाशिक जिल्ह्यातील एक समृद्ध आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे. निसर्गाच्या कुशीत
वसलेले हे गाव आपल्या शांत आणि सुसंस्कृत वातावरणासाठी ओळखले जाते. इथली सुपीक जमीन आणि मेहनती शेतकरी हा
गावाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. वडगाव पिंगळा हे केवळ एक गाव नसून, येथील एकजुटीची भावना आणि
परस्परांना मदतीची संस्कृती याने बनलेले एक कुटुंब आहे.
ग्रामपंचायत वडगाव पिंगळा आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. 'सहकार्यातून समृद्धीकडे' हे
आमचे ध्येय आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सहभागातून आणि सूचनांमधून आम्ही विकासाची दिशा निश्चित करतो.
पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि जलसंधारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सुधारणा
आणण्यासाठी ग्रामपंचायत सतत प्रयत्नशील आहे.
ग्रामपंचायत वडगाव पिंगळा आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. 'सहकार्यातून समृद्धीकडे' हे
आमचे ध्येय आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सहभागातून आणि सूचनांमधून आम्ही विकासाची दिशा निश्चित करतो.
पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि जलसंधारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सुधारणा
आणण्यासाठी ग्रामपंचायत सतत प्रयत्नशील आहे.
आमचे गाव एक आदर्श ग्राम बनवण्याचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात गावातील प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग
महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक मजबूत करून, आम्ही पारदर्शक आणि जबाबदार
कारभारावर भर देत आहोत. आपल्या सूचना, कल्पना आणि सहकार्याशिवाय हे कार्य अपूर्ण आहे.
आपले वडगाव पिंगळा हे एक सुंदर, स्वच्छ आणि प्रगतीशील गाव बनवण्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करूया. या
वेबसाईटद्वारे आम्ही गावाशी संबंधित सर्व माहिती, योजना आणि उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा
प्रयत्न करत आहोत. आपल्या मौल्यवान प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत.
सिन्नर- तालुक्यातील वडगाव पिंगळा हे गाव शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा अंगीकार करणारे. गेल्या पाच
वर्षांचा विचार केल्यास इथले शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती पिकवत होते. मात्र, अटल भूजल
योजनेची या गावात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या
गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्षाकाठी आठ ते दहा लाखांच्या घरात पोहोचले आहे. इथल्या
शेतकऱ्यांनी जल व्यवस्थापनाचे महत्त्व जाणल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख मोरोपंत पिंगळे
यांच्या जहागिरीचे गाव असलेल्या वडगाव पिंगळा गावामध्ये पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी
होळकरकालीन बारवेवर अवलंबून राहावे लागायचे. मुख्यमंत्री पेजल योजना, जलजीवन मिशनअंतर्गत
अलीकडच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहीर खोदण्यात आली. दारणा नदीवरून गावासाठी दोन
अतिरिक्त जलस्रोत उपलब्ध झाल्याने गावासह लगतच्या शेती वस्त्यांपर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी
पोचविण्यात आले.
शेती मुख्य व्यवसाय असलेल्या गावकऱ्यांनी दुग्ध, कुक्कुटपालन व्यवसाय वाढीस आणला. द्राक्ष
साठवणुकीसाठी शीतगृह, सेंद्रिय कंपोस्ट खतनिर्मिती, उत्पादित शेतीमाल सुकवून त्याची विक्री
करण्यासाठी सौर ड्रायर असे प्रकल्प आज गावात उभे आहेत. स्थानिक कृषी वार्ता फार्मर प्रोडूसर
कंपनीसह सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या
शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. आज घडीला सुमारे ४० शेतकऱ्यांनी शेडनेट उभे आहेत.